चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या शहरातील राहटणी येथे आल्या होत्या. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. सध्याचा काळ हा कसोशीचा आहे. एक कार्यकर्ता नेता होऊन पक्षाचं नेतृत्व करू शकतो हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं आहे. अशा शब्दांत पंकजांनी शिंदेंचं कौतुक केलं. तर शिवसेना नाव नसताना पक्ष कसा उभा करायचा हा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा प्रश्न असेल, असंही त्या म्हणाल्या