उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसोबतची (BJP) युती तोडून काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार स्थापन केल्यापासून ठाकरे-फडणवीसांमध्ये संघर्ष सुरु झाला. कालांतराने हा संघर्ष शिगेला पोहोचला आणि याच संघर्षातून शिवसेनेत (Shivsena) फूट पडून ठाकरेंचं सरकारही कोसळलं. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप होत आहेत, पण हे सगळं घडत असलं, तरी आपण शत्रू नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वारंवार ठाकरेंविरोधात संघर्ष केवळ राजकीय असल्याचं सांगत आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत. पण असं झालं तर मग शिंदे गटाचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
#UddhavThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #BJP #Politics #AadityaThackeray #Congress #NCP #SharadPawar #Maharashtra #SanjayRaut #SandipanBhumre #Matoshree #MahavikasAghadi #MVA