विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गट आणि भाजपावर निशाणा साधताना केलं असून याच वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. राऊतांच्या विधानानंतर भाजपा आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. आमदार नितेश राणे यांनी या व्यक्तव्यावरून राऊतांवर निशाणा साधताना '१० मिनिटं सुरक्षा हटवा..संजय राऊत उद्या दिसणार नाही' असे विधान केले.