राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात राबवली जाईल. याअंतर्गत मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला ७५ हजार रुपये मिळणार. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना हा लाभ मिळणार आहे. शिवाय महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट देण्यात आली आहे.