अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती देणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही स्थगिती हटवली नाही तर १४ मार्चला विधानभवनाच्या आवारात आमरण उपोषणाला बसणार असा इशारा नितीन देशमुख यांनी दिला आहे.