महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजित पवारांनी रोहित पवारांना पाडण्यासाठी फोन केला होता, असा आरोप शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला होता. त्यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या एक ट्रेंड आला आहे. पवार कुटुंबावर बोललं की मोठं होतं. नरेश म्हस्के यांनी केलेल्या आरोपाला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही. नरेश म्हस्के यांना पवार कुटुंब हे कधीच कळणार नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला.