Shrikant Shinde: 'विकासाचा एकही शब्द काढायचा नाही आणि...'; मविआच्या सभेवर श्रीकांत शिंदेंची टीका
'महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नुसत्या शिव्या-शाप देण्याचं काम केलं जात आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्राने कधी पाहिल् पाहिली नव्हती. जो कधी विचार केला नव्हता ते झालं, राज्यात सत्ताबदल झाला आणि त्यामुळे हा थयथयाट सुरू आहे' अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर केली. 'विकासाचा एकही शब्द काढायचा नाही, जे आज मोठ्या मोठ्या सभा करतायत त्यांनी अडीच वर्षात काय काम केलं हे सभेतून सांगितले पाहिजे' असे वक्तव्य करत उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला.