Sanjay Raut: 'शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटन...'; अयोध्या दौऱ्यावर राऊतांची टीका
'एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना आम्हीच अयोध्येला घेऊन गेलो होते. सत्यवचनी प्रभू श्रीरामच्या दर्शनाला अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो. पण, रामाचे सत्यवचन तुम्ही कोठून घेणार आहात? जेव्हा पक्ष सोडला, बेईमानी केली सुरत आणि गुवाहाटील दर्शनासाठी गेला. तेव्हा रामाची आठवण झाली नाही', अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते