विरोधीपक्ष नेते अजित पवार जो निर्णय घेतील, त्याला माझा पाठिंबा असेल, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही अजित पवारांबरोबर भाजपात जाणार, असंही म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर आमदार अण्णा बनसोडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने राष्ट्रवादीच्या गोटातील हालचाली वाढल्याची चिन्हं आहेत.