मंडळी ,पुणे हे जसं 'विद्वानांचे' शहर मानलं जातं तसंच 'खवय्यांच' शहर मानलं जातं कारण इथल्या प्रत्येक गल्लीत जर आपल्या बुद्धीने समोरच्याला आपली पातळी दाखवून देणारी लोकं असतील तर अगदी त्याच पॅशनने रविवारी सकाळी वैशाली किंवा रुपालीसमोर शिस्तीत रांगेत उभे राहून आपल्या आवडत्या पदार्थाची वाट बघत उभे असलेले लोकसुद्धा आपल्याला हमखास दिसतात, याच पुण्यात राहणार माणूस कधीच उपाशी मारू शकत नाही कारण इथल्या प्रत्येक मार्गावर आपल्यासाठी मेजवानी असते ,मग तो वडापाव असेल किंवा मिसळ असेल. याच पुणेकरांसाठी व महाराष्ट्रातील तमाम खवय्यांसाठी सकाळ घेऊन येतय एक असा चमचमीत शो कि जो उत्तम उत्तम रेस्टोरंट व तेथील खाद्यपदार्थांची माहिती देईल ज्याचं नाव आहे Foody Moody.
तर मंडळी या नवीन फूड सिरीज मध्ये आज आपण Italy via Punjab या रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत,याठिकाणी अप्रतिम असा ढाबा आणि रेट्रो फील दाखवण्यात आला आहे .अप्रतिम रंग रंगोटी आणि विशेष म्हणजे उन्हाळच्या पार्श्वभूमी वर इथे एसी किव्हा कुलर नसून इथे थंड वातावरण बनवण्यासाठी गार पाण्याचे मंद फवारे सेट करण्यात आले आहेत .जेवणा बद्दल पहिला तर इथे इटालियन जेवणालाभारतीय तडका देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे म्हणूनच 'इटली व्हाया पंजाब' ह्या नावातच गंमत वाटते...!
इथे आल्यानंतर कोरोनाचे सगळे नियम पाळण्यात आले. अगोदर तापमान चेक करण्यात आले त्यानंतर Sanitaziation पण करण्यात आलं.सर्व काळजी घेऊन आम्ही आत प्रवेश केल्यावर डोळ्यात भरणारी उत्तम वास्तू आमच्या नजरेस पडली. तेथील भिंतीवर असणारी रंगसंगती एकदम आकर्षक असून तो सगळं औरा आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जातो .टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ बनवून सुद्धा ती वस्तू नव्यासारखी कशी दिसेल हे शिकायचं असेल तर या रेस्टॉरंटमध्ये जावंच. जसं की जुन्या वाड्याच्या खिडक्या असतील किंवा रंगवलेले खांब किंवा विशिष्ट पद्धतीच्या खुर्च्या
यातील नावीन्यतासुद्धा आपले आकर्षण ठरते . इथे असणारे रिक्षा आणि स्कुटर आपल्याला नकळत त्यांच्यावर बसून फोटो काढायचा मोह पाडतात.
इथे आल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या रेस्टॉरंट मध्ये गेल्या सारखा वाटणार नाही पण ढाबाच्या शैलीचा नक्कीच वाटेल. इथे बसण्यांसाठी नॉर्मल खुर्च्या नसून वेगळ्या पद्दतिच्या आकर्षक ?