शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, कंगनाच्या कार्यालयावर कायद्यानुसार कारवाई झाली आहे. ही सरकारची कारवाई आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही...तसंच कंगनाने शिवसेनाला बाबराची सेना म्हटले आहे. यावर राऊत यांनी बाबरी तोडणारे आम्हीच आहोत. ती आम्हाला काय म्हणतेय? कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईचे टायमिंगबाबतचे उत्तर केवळ मुंबई महापालिकेचे आयुक्त देऊ शकतात. जर कोणी कायदा मोडत असेल तर त्यावर कारवाई केली जाते. अशावेळी पक्षाकडे माहिती असणे गरजेचे नाही, असे सांगितले. तसंच मुंबई महापालिकेच्या कारवाईचे प्रकरण आता उच्च न्यायालयाच गेले आहे. तिथेच पालिका उत्तर देईल. ही कारवाई बदल्याच्या भावनेतून झालेली नाही. मुंबईत देशभरातील लोक येऊन राहतात. कंगना जे आता काही करत आहे ते सरकारच्या हातात आहे. शिवसेना कधीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहत नाही.
#lokmat #kaganaranaut #sanjayraut #BMC #Cmuddhavthackeray
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber