आता जर तुम्ही तुमचं आधार कार्ड लॅमिनेशन केलं असेल किंवा प्लास्टिक कोटिंग लावलं असेल तर त्या आधार कार्डला काहीच अर्थ उरणार नाही. ते आधार कार्ड बिनकामाचं ठरणार असल्याचं युआयडीएआयने स्पष्ट केलंय.लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधार कार्डचा क्यू आर काम करणं बंद होऊ शकतं. त्यामुळे खासगी माहिती चोरली जाऊ शकते. युआयडीएआयने आधार कार्डच्या चुकीच्या प्रकारे होणा-या वापराबाबत चिंता व्यक्त केलीय.स्मार्ट किंवा प्लास्टिक आधार कार्ड अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. तसंच अनधिकृत व्यक्तीला आधार कार्ड नंबर देऊ नका, असं आवाहन युआयडी एआयने केलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews