चटणीच्या गरम भांड्यातून पडल्यामुळे दीड वर्षांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागला. ८० टक्के भाजलेल्या तनुष्काचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.तनुष्काचे वडील रामास्वामी अंबरनाथमधील शास्त्रीनगर परिसरात राहतात. त्यांचा इडली सांबार विक्रीचा व्यवसाय आहे. रोजप्रमाणे रामास्वामी यांनी मंगळवारी सकाळीही साडेपाच वाजता इडली सोबत लागणारी टॉमेटोची चटणी तयार करुन एका टोपात भरुन ठेवली होती. दीड वर्षांची तनुष्का खेळता खेळता चटणीच्या टोपाजवळ गेली. तोल गेल्यामुळे तनुष्का चटणीच्या भांड्यात पडली. त्याच अवस्थेत तनुष्काला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तनुष्काचा मृत्यू झाला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews