अमेरिकेत व्हिस्कॉन्सिन येथे ट्रान्सजेंडर पुरुषाने बाळाला जन्म दिला आहे. केसी सोलिवन असं या ३० वर्षीय ट्रान्सजेंडरचं नाव आहे. बाळंतकळा सुरू झाल्यानंतर सिझेरियनद्वारे बाळाचा जन्म झाला. बाळ सुदृढ असून त्याचं वजन ३ किलो ६०० ग्रॅम आहे. हे मूल केसीचा जोडीदार स्टीवन (२७) याचं आहे. केसी गर्भार राहिल्यानंतर त्याने पुरुष हार्मोन्स घेणे थांबवले होते केसी आधी महिला म्हणून आयुष्य जगत होती. तिला आधीच्या नवऱ्यापासून एक पाच वर्षांचं मूल आहे. मात्र गेल्या ४ वर्षांपासून केसी पुरुष म्हणून आपल्या जोडीदाराबरोबर राहात आहे. बाळाचं लिंग कोणतं, याचा खुलासा न करण्याचा निर्णय या जोडप्यांनी घेतला आहे. बाळ मोठं झाल्यावर आपल्या लैंगिकतेबाबतचा निर्णय स्वत:च घेईल, असं त्यांचं म्हणणं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews