Marathi Bhasha Diwas l तब्बल २२०० वर्ष जुना मराठीचा इतिहास ; प्राचीन भारतातलीसमृद्ध मराठी भाषा | Sakal
गेली अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत असुन नाणेघाटातील हाच दोन हजार वर्षांपूर्वीचा पुरावा त्यासाठी ग्राह्य धरला जात आहे. यात महारठ्ठी भाषा बोलणारे लोक व ते ज्या प्रदेशात राहतात तो प्रदेश म्हणजेच महारठी प्रदेश म्हणजेच आजचा महाराष्ट्र होय. त्याच प्रमाणे सातवाहन कुलातील राजा हाल याने प्राकृत भाषेत गाथासप्तशती हा ग्रंथ लिहला असुन हा ग्रंथ महाराष्ट्राचा आद्य ग्रंथ मानला जातो व त्यावेळच्या महाराष्ट्राचे जनजीवन तसेच विविध रूपे आपल्याला या काव्य ग्रंथात आपणास वाचायला मिळतात.
#MarathiBhashaDiwas , #Maharashtra, #Marathi, #Pune, #Satara, #Nagpur, #Aurangabaad, #Naneghaat,