Russia-Ukraine War | रशिया - युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या दरात वाढ | sakal |
रशिया - युक्रेन युद्धाचा गव्हाच्या दरावर मोठा परिणाम झालाय. नागपूरच्या कळमना धान्य बाजारात गेल्या १५ दिवसांत गव्हाच्या दरात प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये वाढ झालीय. १५ दिवसांपूर्वी १९०० रुपये क्विंटल विकला जाणारा गहू सध्या २३०० रुपये क्विंटलवर पोहोचलाय. रशिया जगातला सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे, युक्रेनमधूनंही मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होते, मात्र सध्या हे दोन्ही देश युद्धात असल्याने येथील गव्हाची निर्यात थांबलीय. त्यामुळे गव्हू उत्पादनात दुसऱ्या नंबरवर असलेल्या भारताला गहू निर्यातीची चांगली संधी आहे. रशिया - युक्रेनवरुन गव्हाची आयात करणारे देश, सध्या भारतीय गव्हाची मागणी करु लागलेय. त्यामुळे सध्या गव्हाच्या दरात तेजी आहे. पुढील काळात गव्हाचे दर आणखी वाढणार आहेत.
#Russiaukrainewar #Grains #Maharashtranews #Marathinews