राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून सुरु झाली आहे. ही भारत जोडो पदयात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली असून आज नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील या यात्रेत सहभागी झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून संजय राऊत यांच्या सुटकेबाबतही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. तसेच राऊतांना जो न्याय मिळाला तोच न्याय राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनाही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
#SupriyaSule #SanjayRaut #NawabMalik #AnilDeshmukh #BharatJodoYatra #RahulGandhi #Congress #Maharashtra #Nanded #NanaPatole #NCP #JayantPatil #SoniaGandhi #Maharashtra